पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अमळनेर न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
पारोळा पोलीस स्थानकामध्ये दिकांन ६/४/२०१९ रोजी पीडित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आोपातून शाकीर मुनीर खाटीक ( रा. मोहाडी, ता. पारोळा ) याच्या विरोधात भादंवि कलम ३५४,३२३ भा द वि सहकलम-११, १२ पोक्सो कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक केली करण्यात आली होती.
दरम्यान, या गुन्ह्याचा तपास महिला फौजदार यशोदा कणसे यांनी सेशन कोर्ट अमळनेर येथे आरोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्यात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. या अनुषंगाने सुनावणी झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालय प्रथमवर्ग अमळनेर एस बी गायधने यांनी सदर आरोपीस भादंवि कलम अंतर्गत ३ वर्ष शिक्षा व ५००/- रुपये दंड,दंड न भरल्यास ३ महिने शिक्षा तसेच कलम मध्ये १ वर्ष कारावास व ५००/- रुपये दंड,दंड न भरल्यास २ महिने शिक्षा तसेच कलम १२ पोक्सो मध्ये ३ वर्ष कारावास थ ५००/- रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
आरोपीला ही शिक्षा एकाच वेळेस भोगावयाची आहे. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून शशिकांत पाटील यांनी कामकाज पाहिले असून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी एएसआय उदयसिंग साळुंके यांनी कामकाज पाहिले आहे.