Home प्रशासन अखेर नरभक्षक बिबट्या वन विभागाच्या सापळ्यात अडकला !

अखेर नरभक्षक बिबट्या वन विभागाच्या सापळ्यात अडकला !

0
314

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डांभुर्णी शिवारात बालिकेवर झडप घालून ठार करणारा नरभक्षक बिबट्या वन विभागाने लावलेल्या सापळ्यात अडकला असून त्याला वन खात्याने ताब्यात घेतले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्याच्या पश्चीम भागात व विशेष करून किनगाव-डांभुर्णी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्मित झाले आहे. गेल्या महिन्यात किनगाव शिवारामध्ये बिबट्याने बालकाला ठार केले होते. आणि आता दोन दिवसांपूर्वीच किनगाव शिवारात रत्ना रूपनर या दोन वर्षाच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याने परिसर हादरला आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी वन खात्याला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, वन खात्याने काल बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावला. यात तो बिबट्या एकदा शिकार केल्यानंतर त्याच ठिकाणी येण्याची शक्यता गृहीत धरून शेळ्या-मेंढ्यांनी युक्त असलेला पिंजरा तेथे ठेवण्यात आला. रात्री सुमारे साडेनऊ वाजेच्या सुमारास बिबट्या तेथे आला आणि पिंजऱ्यात अडकला. ताज्या वृत्तानुसार, बिबट्याला इंजेक्शन देऊन बेशुध्द करण्यात आले असून त्याला नागपूर जिल्ह्यातील बोरगाव परिसरातल्या घनदाट अरण्यात सोडण्यासाठी पाठविण्यात आले आहे.


Protected Content

Play sound