अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर रोडवरील आर्मी स्कूलजवळ एका महिलेच्या कानातील ५० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्ती ओरबडून चोरून नेल्याची धक्कादायक घटना २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता घडली होती. याप्रकरणी अखेर शनिवारी ६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिराबाई समाधान कोळी वय ५५ रा. अंबापिंप्री ता. पारोळा या महिला २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अमळनेर रोडवरील आर्मी स्कूल जवळून जात असतांना संशयित आरोपी विनोद विक्रम कोळी रा. खंबाळे ता. शिरपूर याने महिलेच्या कानातील ८ ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओरबडून चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेत महिलेच्या कानाला मोठी दुखापत केली. रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर शनीवारी ६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी विनोद विक्रम कोळी रा. अंबापिंप्री ता. पारोळा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी त्याला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हे करीत आहे.




