जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको येथील महापालिकेच्या रुग्णालयाचा दरवाजात तोडून चोरट्यांनी रुग्णालयातील इर्न्व्हटरची १५ हजार रुपये किंमतीची बॅटरी लांबविल्याऱ्या अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
पिंप्राळा हुडकोतील एका अल्पवयीन मुलाने ही बॅटरी चोरुन त्याच्या घरातच ठेवली असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस हवालदार प्रदीप पाटील, सुनील दामोदरे, पोलीस नाईक विजय शामराव पाटील, अविनाश देवरे, दिपक शिंदे, पंकज शिंदे यांच्या पथकाला कारवाईच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार पथकाने आज मंगळवारी दुपारी पिंप्राळा हुडको गाठून चोरी करणार्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात जप्त बॅटरी जप्त करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी त्यास रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.