Home आरोग्य ममता बॅनर्जी सरकारचे संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेकडून कौतूक

ममता बॅनर्जी सरकारचे संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेकडून कौतूक


कोलकाता वृत्तसंस्था । युनायटेड नेशन्स वर्ल्ड पीस असोशिएशनने करोनाच्या नियंत्रणाबद्दल पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले आहे.

या संघटनेचे संस्थापक फुसाओ कितागवा यांनी पश्‍चिम बंगालचे कामगार मंत्री निर्मल माजी यांना पत्र पाठवून त्यांच्या सरकारच्या कार्याचा गौरव केला आहे. या सरकारने करोना नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती आम्हाला आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून समजली.

तुमच्या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनीही मोठे मानवतावादी काम केले आहे, असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. या पत्राबद्दल माजी यांनीही या संघटनेचे आभार मानले आहेत. या पत्रातील गौरवामुळे आपला सन्मान झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे.


Protected Content

Play sound