कोलकाता । नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दणदणीत विजय संपादन केल्यानंतर आज तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी तिसर्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा शपथविधी सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. ममता यांनी या शपथविधी सोहळ्यासाठी पांढरी साडी आणि शाल परिधान केली होती. त्यांनी बंगाली भाषेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बाकीचे सर्व मंत्री ९ मे रोजी रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिवशी शपथ घेतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. या शपथविधीनंतर राज्यपाल धनकर यांनी ममता यांचं अभिनंदन केलं आणि सध्या चाललेला हिंसाचार थांबवून पुन्हा एकदा शांतता व सुव्यवस्था स्थापन करण्यास सांगितलं आहे.