चोपडा । तालुक्यातील मामलदे येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शहरातील दातृत्व भाव असणार्या व्यक्तींनी गरजू विद्यार्थ्यांना दप्तरे प्रदान केली.
शहरातील हरताळकर हॉस्पिटलच्या डॉ. नीता हरताळकर, शारदा मॅथ क्लासचे संचालक गौरव महाले, शारदा क्लासेसचे नंदकिशोर देशमुख यांनी व शाळेतील शिक्षकांनी निधी एकत्र करून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व दप्तरे भेट दिली. प्रवेश उत्सवा निमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. विद्यार्थ्यांनी गौरव महाले, नंदकिशोर देशमुख यांच्या मुलाखती घेतल्या. मुख्याध्यापक बापू गुरव, संजय चौधरी, श्रीमती रत्ना सोनार, प्रकाश बाविस्कर, श्रीमती सोनाली साळुंखे, महेश साळुंखे, दिनेश चौधरी यांनी या कामी योगदान दिले.