धरणगाव, प्रतिनिधी | येथील सावता माळी समाज सुधारणा मंडळातर्फे नुकताच माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण-गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंहामंडलेश्वर महंत भगवान महाराज होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के.आर. वाघ यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणुन नायब तहसीलदार मोहोळ, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी आमदार हरीभाऊ महाजन हे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते संत शिरोमणी सावता महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची महानायिका सावित्री माई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन व पंच मंडळच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी इ.१० वी, इ.१२ वी, पदवी प्राप्त प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाल्येल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ‘राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले चरीत्र’, ‘विद्येची महानायिका सावित्रीमाई फुले’, ‘विद्यार्थ्यांनो जागृत व्हा !’, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ग्रंथ व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर नायब तहसीलदार मोहोळ, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, आर.डी. महाजन यांनी गुणवंत विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महंत भगवानबाबा यांनी शिका मोठे व्हा ! , आई – वडीलांचा मान -सन्मान करा. गुरूजनांचा आदर करा, असा संदेश दिला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्ही.टी. माळी, पी.डी. पाटील व हेमंत माळी यांनी केले तर आभार व्ही.टी. माळी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाज पंच मंडळाचे उपाध्यक्ष निंबाजी महाजन, योगराज महाजन, सचिव दशरथ महाजन, डिगंबर महाजन, विजय महाजन, कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी, हेमंत माळी, कैलास माळी, रमेशगुरूजी, आर.डी. महाजन, पी.डी. पाटील, नितेश महाजन व समस्त माळी समाज बांधव यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी,पालक व समाज बांधव उपस्थित होते.