Home Agri Trends चोरवड येथील युवा शेतकरी मल्हार कुंभार यांना महाराष्ट्र शासन कृषि शेतकरी पुरस्कार...

चोरवड येथील युवा शेतकरी मल्हार कुंभार यांना महाराष्ट्र शासन कृषि शेतकरी पुरस्कार जाहीर


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील चोरवड येथील युवाशेतकरी आणि यशस्वी शेतकरी मल्हार कुंभार यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून दिला जाणारा “युवा शेतकरी २०२०” हा पुरस्कार जाहिर झाला असून नाशिक विभागातून धुळे, नंदुरबार व नासिक या जिल्ह्यातून निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासना च्या कृषी विभागामार्फत युवा शेतकरी पुरस्कार हा प्रथमच देण्यात येत असून विभाग स्तरावर एका शेतकऱ्याची निवड करण्यात आली आहे.

नाशिक विभागातील पहिला युवा शेतकरी पुरस्कार हा मल्हार कुंभार यांना मिळाल्याने पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.शेतकऱ्यांचा समृद्ध व्हावा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा शाश्वत विकास व्हावा यासाठी शासनाकडून अनेक लाभदायी योजनांची अंमलबजावणी केली जात असून या लाभ घेऊन जळगाव जिल्ह्यातील चोरवड येथील युवा शेतकरी मल्हार कुंभार यांनी आधुनिक पद्धतीने शेती करत आदर्श शेतकरी बनले आहेत. युवा शेतकरी मल्हार कुंभार यांचे कृषी पदवी पर्यंत शिक्षण झाले आहे.


Protected Content

Play sound