चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मल्हारगड येथील मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेला अवशेष पुन्हा एकदा जगासमोर यावा इतिहासाने त्याची नोंद घ्यावी या उद्देशाने सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव मार्फत गडावरील ही माती बाजूला करून तो मोकळा करण्यात येत आहे. यासाठी रविवार 19 मे रोजी दुसरी मोहीम घेण्यात येऊन संपन्न झाली.
आजच्या मोहिमेत जवळपास दोन फूट माती बाजूला करण्यात आली यामुळे या मार्गाचा बराचसा भाग मोकळा झाला आणखी काही मोहिमा झाल्यानंतर तो पूर्णपणे मोकळा श्वास घेईल हा प्रयत्न आहे प्रचंड ऊन असल्यामुळे व लग्न तिथी मोठी असल्याने मोहीम सकाळी सहा वाजता सुरू करून अकरा वाजता संपविण्यात आली. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप घोरपडे, दिगंबर शिर्के, गजानन मोरे, जयवंत शेलार, जितेंद्र वाघ, संजय पवार, हेमंत भोईटे, हर्षवर्धन साळुंखे, सचिन घोरपडे, अजय घोरपडे, प्रतीक पाटील, यश चिंचोले, सचिन पाटील, पप्पू पाटील यांनी परिश्रम घेतले.