मुंबई (वृत्तसंस्था) मालेगाव बॉम्ब स्फोटासाठी वापरण्यात आलेली प्रज्ञा सिंह ठाकूर यांची मोटरसायकल साक्षीदाराने ओळखली आहे. यामुळे यांच्या प्रज्ञा यांच्याअडचणी वाढण्याची शक्यता आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर मालेगाव बॉम्ब स्फोटाचा कट रचण्याचा आरोप आहे. २००८ मध्ये झालेल्या मालेगावातील मशिदीजवळ स्फोट झाला होता. या स्फोटात ६ जण ठार झाले होते. दरम्यान मालेगाव स्फोट प्रकरणात प्रज्ञा ठाकूर, कर्नल पुरोहित आणि दयानंद पांडे मुख्य आरोपी आहेत. दरम्यान, आज मोटरसायकल आणि इतर पुरावे एका टेम्पोत भरून कोर्ट परिसरात आणले होते. टेम्पोत पाळीपाळीने जाऊन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि न्यायाधीशांनी पाहणी केली. Freedom bike हा लोगो पाहून साक्षीदाराने ही गाडी ओळखली. मालेगाव स्फोटात या बाईकचा मागचा भाग पूर्णपणे नष्ट झाला होता. तर पुढचा भाग शाबूत आहे, आज आणलेल्या पुराव्यांमध्ये अनेक सायकल्सचाही समावेश होता. टेम्पोमध्ये जे पुरावे आहेत त्याची पाहणी साक्षीदार आणि मग न्यायाधीशांनी केली. साक्षीदाराने ओळखलेली गाडी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची असल्याचा आरोप आहे. दरम्यान, संघाचे प्रचारक सुनील जोशी यांच्या हत्येचाही आरोप प्रज्ञा ठाकूर यांच्यावर आहे.