डीपीच्या शार्टसर्कीटमुळे मका जळून खाक; शेतकऱ्याचे ५ लाखांचे नुकसान

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मार्दुणे शिवारातील शेत गट क्रमांक २८२ मधील महावितरण कंपनीच्या डी.पी.वर झालेल्या शार्टसर्कीटमुळे शेतातील ५ लाख रूपये किंमतीचा मका जळून खाक झाल्याची घटना गुरूवार २ मे रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ४ मे रोजी सकाळी ११ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, दगडून उत्तम पाटील वय ४१ रा. मार्दुणे ता. चाळीसगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे मार्दूणे शिवारातील शेत गट क्रमांक २८२ मध्ये शेत आहे. या शेतात त्यांनी मका जमा करून ठेवलेला होता. दरम्यान त्यांच्या शेतात असलेल्या महावितरण कंपनीचे डीपीवर झालेल्या शार्टसर्कीटमुळे शेतातील ५ लाख रूपये किंमतीचा मका जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना गुरूवार २ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिवारी ४ मे रोजी रात्री ११ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. त्यानुसार अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ योगेश मांडोळे हे करीत आहे.

Protected Content