मैत्री संघ फाऊंडेशनतर्फे ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर वह्यांची विक्री

erandol

एरंडोल प्रतिनिधी । शहरातील अग्रेसर असणारे मैत्री संघ फाऊंडेशनतर्फे यावर्षी गरीब विद्यार्थ्यांसाठी शहरात ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर मेन रोडवरील जुने शाम साडी सेंटर येथे वह्यांचे स्टॉल लावण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोल शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी हे होते. मैत्री संघ फाउंडेशनला भविष्यात नागरपालिके तर्फे जागा देण्याचे आश्वासन यावेळी नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी दिले. तर कॉग्रेसचे तालूकाध्यक्ष विजय महाजन यांनी देखील मैत्री संघ फाउंडेशनला मदत करण्याचे आश्वासन दिले. माजी उपानगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड यांनी फाऊंडेशनचे सभासद विद्यार्थी असून देखील त्यांनी गरीब विद्यार्थ्यासाठी केलेली धडपड पाहून कौतुक केले. तसेच या आधी देखील मैत्री संघ फाउंडेशनने “माणुसकीची भिंत” असे कार्यक्रम या अगोदर शहरात घडवून आणले आहेत. मैत्री संघ फाउंडेशन च्या विद्यार्थ्यांचे शहरात कौतुक होत आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील, नगरसेवक नितीन चौधरी, प्रा.आर.एस.पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, माजी उपनगराध्यक्ष संजय महाजन, युवासेनेचे तालुकाध्यक्ष बबलु पाटील, भाजपा युवा शहराध्यक्ष प्रशांत महाजन, नगरसेवक योगेश महाजन, अतुल महाजन, प्रमोद महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर महाजन, कल्पेश महाजन, पियुष चौधरी, तुषार महाजन, पंकज पाटील, साहिल पिंजारी, निखील वाणी, हितेश पाटील, विनीत पाटील, शुभम महाजन यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक किशोर मोराणकर यांनी केले तर आभार प्रविण महाजन यांनी मानले.

 

Protected Content