जळगाव (प्रतिनिधी) महापालिकेतर्फे महिला सबलीकरणासाठी शहरातील सर्व महिला बचत गटांच्या उन्नती, विकासासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत असून महिला बचत गटांनी महापौर दालनात नोंदणी करणे आवश्यक आहे.
महापालिकेतर्फे आठवड्यातील एक-दोन दिवस फक्त महिला बचत गटांव्दारे उत्पादित वस्तु, खाद्य पदार्थ व साहित्यांना बाजार पेठ उपलब्ध करुन देणेसाठी शहरात मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याउपक्रमाअतर्गत शहरातील ज्या-ज्या महिला बचत गटांना नियोजित स्थळी आठवड्यातुन एक, दोन दिवस स्टॉल उभारुन पदार्थ, साहित्य तत्सम विक्री करावयाचे आहेत, अश्या महिला बचत गटांनी महापौर सिमा भोळे यांच्या दालना नोंदणी करावी असे आवाहन करण्यात येत आहे.