जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर माहेश्वरी सभा, बालाजी पेठ, भवानी पेठ, बळीराम पेठ परिसर यांच्या वतीने आदित्य फार्म येथे “एक शाम देश के नाम” या भव्य देशभक्तीपर जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सुमारे १ हजार हून अधिक समाजबांधव उपस्थित होते, ज्यामुळे देशभक्तीचा एक मोठा जल्लोष पाहायला मिळाला.
या विशेष कार्यक्रमात पाच ते दहा वयोगटातील मुलांसाठी, तसेच ५० वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींसाठी देशभक्तीवर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये फॅन्सी ड्रेस, समूहगीत गायन, जोडी नृत्य आणि समूहनृत्य या स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये जवळपास २०० स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतला. विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आदित्य फार्म, निकम अँड लाठी असोसिएट्स आणि सुप्रीम इंडस्ट्रीज होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर माननीय नितीनजी लड्डा उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात शिव लाठी यांनी सांगितले की, हा कार्यक्रम केवळ मनोरंजनासाठी नसून, प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्ती जागृत व्हावी, हा यामागील प्रमुख उद्देश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली लाहोटी आणि जयश्री लाठी यांनी केले.
समूहनृत्य स्पर्धेत पिंप्राळा झोनने प्रथम क्रमांक पटकावून विशेष कौतुकास पात्र ठरले. अध्यक्ष मयूर सोमानी, सचिव वितेश भदादा, व वीणा सोमाणी यांनी या विजयासाठी खूप परिश्रम घेतले. नृत्यासाठी अजय शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. पिंप्राळा झोनच्या विजयी स्पर्धकांमध्ये सपना अजमेरा, दीपिका अजमेरा, रिंकू मालिवाल, भाविका मालुधाणे, श्रेया सोमानी, नेहा जाखेटे, नेहा जावर, मयूर सोमानी, दर्शन अजमेरा (राजगुरु), अरुणा अजमेरा (गांधीजी), नैतिक कोठारी (सुखदेव), कैवल्य पोरवाल (भगतसिंग), दर्शना जाखेटे (झाशीची राणी), हंशिका झंवर (सुभाषचंद्र बोस) यांचा समावेश होता. तसेच, लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मन योगेश मालिवाल यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्रमोद झंवर, रमण लाहोटी, शिव लाठी, संतोष समदाणी, राधेश्याम सोमानी, योगिता दहाड, आनंद बिर्ला, सारिका मंडोरा यांचा मोलाचा वाटा होता. या कार्यक्रमामुळे जळगावमध्ये देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.



