भुसावळ, प्रतिनिधी | येथील माहेश्वरी समाजातर्फे कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील पूरग्रस्तांना आर्थिक मदतीसह सुमारे ट्रकभर जीवनावश्यक सामान पाठवण्यात आले आहे. काल (दि.१२) रात्री ट्रकमध्ये कपडे, ब्लॅन्केट, गादया, सतरंजी, बिस्कीटचे पैकेट, फळे, भाज्यांसह इतर जिवनावश्यक अशा वस्तू पॅक करुन पाठवण्यात आल्या आहेत.
यावेळी आमदार संजय सावकारे, उदयोगपती व नगरसेवक मनोज बियाणी, निर्मल (पिंटू) कोठारी, समाज अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, संजय लाहोटी, राजेश लढ्ढा, गोविंद हेडा, गोपाल हेडा, महेश हेडा, घनश्याम मंडोरा, जे.बी.कोटेचा, संजय चांडक, व्दारकादास दरगड, मनोज माहेश्वरी, राजेश पारीख, प्रविण भराडिया, मयुर नागोरी, सर्वेश लाहोटी, विणा लाहोटी, शशी लाहोटी, डॉ.संगीता चांडक, स्नेहा लढ्ढा, राधा झवर, वंदना चांडक, राधा हेडा, पुष्पा लढ्ढा आदी उपस्थित होते.