जळगाव प्रतिनिधी । शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातल्या माहेश्वरी महिला मंडळातर्फे अजिंठा चौफुलीवर मोफत जलसेवा देण्यात येत आहे.
शहरातील अयोध्यानगर, औद्योगिक वसाहत परिसर माहेश्वरी महिला मंडळ जळगाव यांच्या माध्यमातून अजिंठा चौफुली येथे पाण्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत. येथे लोकांची तहान भागवण्यासाठी पाणी व सरबत वाटप करण्यात येते. हा उपक्रम दोन ते तीन वर्षापासून राबविण्यात येत आहे. प्रवाशांची तहान भागवणे व तसेच समाजसेवा करण्यासाठी याला राबविण्यात येत आहे. या माहेश्वरी महिला मंडळाच्या सुमारे ७० सदस्यांचा सहभाग आहे.
पहा : माहेश्वरी महिला मंडळाच्या जलसेवेचा व्हिडीओ.