जळगाव प्रतिनिधी | जळगावच्या उपविभागीय अधिकारीपदी महेश सुधाळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपला कार्यभार सांभाळला आहे.
जळगावच्या तत्कालीन प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्यावर अँटी करप्शन ब्युरोने कारवाई केल्यानंतर हे पद तेव्हापासूनच रिक्त होते. उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांच्याकडे जळगाव प्रांताधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. या अनुषंगाने नुकतीच महेश सुधाळकर यांची या पदावर बदली झाली होती. त्यांनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. याप्रसंगी अधिकारी व कर्मचार्यांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.
महेश सुधाळकर हे आधी नंदुरबार येथे पुनर्वसन अधिकारी म्हणून कार्यरत होते. तेथून आता त्यांनी जळगाव उपविभागाच्या प्रांताधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.