जळगाव प्रतिनिधी । शहरातील कानळदा रोड येथील माहेशवाशिनीचा पैश्यांसाठी मारहाण, शिवीगाळ करणाऱ्या पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील पतीसह इतर दोघांवर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील कानळादा रोडवरील हरी ओम नगर येथील माहेर असलेल्या विवाहिता सविता विनोद कांबळे रा. कुऱ्हाड ता. पाचोरा यांचा विवाह विनोद सुरेश कांबळे रा. कुऱ्हाड ता.पाचोरा यांच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला. काही दिवस चांगले गेल्यानंतर पती विनोद कांबळे यांनी माहेरहून पैसे आणावे यासाठी चरित्र्याचा संशयाचा दमदाटी करायला सुरूवात केली आहे. त्यानंतर शिवीगाळ व मारहाण केली. दरम्यान वेळोवेळी पैश्यांची मागणी करून स्वत:चे जीवाचे बरेवाईट करून घेवून तुमचे नाव पोलीसांना सांगेल अशी दमदाटी केली. याला सासू रेखा सुरेश कांबळे आणि विमलबाई गोबा चव्हाण यांनी पाठबळ दिले. यात विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ सुरू केला. हा छळ असहाय्य झाल्याने विवाहिता माहेरी जळगावला निघून आल्यात. शहर पोलीस ठाण्यात पतीसह इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नितीन अत्तरदे हे करीत आहे.