जळगावातील माहेरवाशिनीचा एक लाखासाठी छळ

जळगाव प्रतिनिधी । जळगाव येथील माहेर असलेल्या २८ वर्षीय विवाहितेला प्लॉट घेण्यासाठी १ लाख रूपये माहेरहुन आणावे अशी मागणी करणाऱ्या अहमदाबाद येथील पतीसह चार जणांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा शिवारात माहेर असलेल्या २८ वर्षीय विवाहितेला अहमदाबाद येथील पंकज मुरलीधर विसपूते यांच्याशी झाले. लग्नानंतर सुरूवातीचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर पती पंकज विसपूते यांनी अहमदाबाद येथे प्लॉट घेण्यासाठी माहेरहुन १ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. यात सारसे मुरलीधर चिंतामन विसपूते, सासून संगिता मुरलीधर विसपूते, दिर मयूर मुरलीधर विसपूते आणि प्रसाद मुरलीधर विसपूते सर्व रा. अहमदाबाद यांनी देखील टोचून बोलणे सुरू केली. छळाला कंटाळून २८ वर्षीय जळगाव येथे माहेरी आई-वडिलांकडे येवून सर्व हकीकत सांगितली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरचे मंडळी अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रध्दा रामोशी करीत आहे.

 

Protected Content