जळगाव प्रतिनिधी । पाचोरा येथील माहेर आणि जळगाव येथील सासर आलेल्या विवाहितेला माहेरहून पैसे आणणे नाही म्हणून रागाच्या भरात अंगावर डिजेल ओतून पेटवून दिल्याची घटना 30 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत शहर पोलीसात पतीसह सासुच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिनाक्षी मनिष बेंडवाल (वय-29) रा. शिवशक्ती नगर, शिवाजी नगर परीसर, यांचे पती मनिष अशोक बेंडवाल हे रिक्षा चालक असून त्यांना तीन मुली आहे. माहेरहून पैसे आणावे यासाठी मनिष यांनी पत्नीला माहेरी पाचोरा येथे 30 जून रोजी सकाळी पाठविले होते. त्याच दिवशी मनिष बेंडवाल हा पत्नी मिनाक्षी हिला घेण्यासाठी रिक्षाने पाचोरा येथे गेला. पाचोराहून रिक्षाने जळगावकडे रात्री 8 वाजता निघाले. दरम्यान रस्त्यावर त्यांनी पैश्यांकरीत एकटे साधत पैसे का आणले नाही असे विचारत मिनाक्षीला मारहाण केली. रात्री 11 वाजता ते शिवशक्ती नगरत पोहचले. घरी आल्यावर पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले. यात संतापाच्या भरात डिझेलची कॅनी मिनाक्षीच्या आंगावर ओतून पेठवून दिले.
यावेळी अराडाओरड सुरू झाल्यानंतर पती मनिषनेच तिला शहरातील खासगी रूग्णालयात उपचाराथ दाखल केले. त्या 82 टक्के भाजल्या गेल्या. शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत. महिलेचा जबाब नोंदवून घेतला. यात पतीने पैश्यांकरीत पेटवून दिले तर याला कारण सासु रामकली अशोक बेंडवाल हिचा देखील सहभाग असल्याचे सांगितले. जळीत महिलेच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात पती आणि सासु विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय जगदीश मोरे करीत आहे.