Home Cities जळगाव जळगाव महापालिकेवर महायुतीचा भगवा ; महायुतीची निर्विवाद सत्ता, उबाठा गट पिछाडीवर

जळगाव महापालिकेवर महायुतीचा भगवा ; महायुतीची निर्विवाद सत्ता, उबाठा गट पिछाडीवर


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून शहराच्या राजकारणात महायुतीने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीने बहुसंख्य जागा जिंकत महापालिकेवर सत्ता मिळवली आहे. याउलट शिवसेना ठाकरे गट (उबाठा) यांना केवळ चार जागांपुरतेच समाधान मानावे लागले असून हा निकाल त्यांच्या दृष्टीने मोठा धक्का मानला जात आहे.

निवडणूक निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. अनेक प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर काही ठिकाणी बिनविरोध निवडीही झाल्या. शिवसेनेनेही महायुतीतील घटक म्हणून महत्त्वाच्या जागा मिळवत सत्ता स्थापनेत निर्णायक भूमिका बजावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मर्यादित का होईना, पण प्रतिनिधित्व मिळाले आहे.

प्रभाग क्रमांक १ मध्ये अ मधून रिता विनोद सपकाळे (भाजप), ब मधून दिलीप बबनराव पोकळे (शिवसेना), क मधून संगीता दांडेकर (शिवसेना) आणि ड मधून भारती सागर सोनावणे (अपक्ष) विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक २ मधून सागर शामकांत सोनवणे (शिवसेना) बिनविरोध निवडून आले, तर ब मधून उज्ज्वला किशोर बाविस्कर (शिवसेना), क मधून पूजा विजय जगताप (भाजप) आणि ड मधून विजय गजानन बांदल (भाजप) यांनी विजय मिळवला.

प्रभाग क्रमांक ३ मध्ये अ अर्चना संजय पाटील (भाजप), ब प्रतीक्षा कैलास सोनवणे (भाजप), क प्रवीण रामदास कोल्हे (शिवसेना) आणि ड निलेश विश्वनाथ तायडे (भाजप) विजयी झाले. प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपने वर्चस्व राखत अ शशीबाई शिवचरण ढंढोरे, ब विद्या मुकुंद सोनावणे, क कल्पेश कैलास सोनवणे, तर ड मधून शिवसेनेचे पियुष ललित कोल्हे विजयी झाले.

प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटप दिसून आले. अ विष्णू रामदास भंगाळे (शिवसेना), ब मंगला संजय चौधरी (शिवसेना), क आशा रमेश पाटील (भाजप) आणि ड नितीन बालमुकुंद लढ्ढा (भाजप) विजयी झाले. प्रभाग क्रमांक ६ मध्ये उबाठा गटाला अ मधून अर्शिन बानो शोएब खाटीक यांच्यामुळे दिलासा मिळाला, मात्र उर्वरित ब, क, ड जागांवर भाजपने विजय मिळवला.

प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजपने क्लीन स्वीप करत दीपमाला मनोज काळे, अंकिता पंकज पाटील आणि विशाल सुरेश भोळे हे तिघे बिनविरोध निवडून आले, तर ड मधून चंद्रशेखर अत्तरदे विजयी झाले. प्रभाग क्रमांक ८ मध्येही भाजपचे वर्चस्व कायम राहिले असून अ सागर पाटील, ब मानसी निलेश भोईटे, क अमर जैन, तर ड मधून शिवसेनेचे नरेंद्र आत्माराम पाटील विजयी झाले.

प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवसेनेचे मनोज सुरेश चौधरी आणि प्रतिभा गजानन देशमुख बिनविरोध निवडून आले, तर क आणि ड मधून भाजपचे जयश्री राहुल पाटील आणि चंद्रशेखर शिवाजी पाटील विजयी झाले. प्रभाग क्रमांक १० मध्ये चारही जागांवर भाजपने विजय मिळवत आपले वर्चस्व अधोरेखित केले.

प्रभाग क्रमांक ११ मध्ये शिवसेनेने चारही जागा जिंकत ताकद दाखवली, तर प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपच्या उमेदवारांनी वर्चस्व राखले, त्यातील दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले. प्रभाग क्रमांक १३ आणि १४ मध्येही भाजपचा दबदबा कायम राहिला असून राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रभाग १३ ड मधून प्रफुल्ल देवकर यांच्या माध्यमातून यश मिळाले.

प्रभाग क्रमांक १५ आणि १६ मध्ये भाजपने बहुसंख्य जागा जिंकल्या, तर प्रभाग क्रमांक १७ मध्ये उबाठा गटाने चारही जागा जिंकत आपली उपस्थिती नोंदवली. प्रभाग क्रमांक १८ आणि १९ मध्ये शिवसेनेचे उमेदवार मोठ्या प्रमाणात विजयी झाले असून काही जागांवर बिनविरोध निवडी झाल्या आहेत.


Protected Content

Play sound