जळगाव प्रतिनिधी । भाजपा-शिवसेन व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांना श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था यांच्या वतीने शिंपी समजाच्या मेळाव्यात जाहीर पाठिंबा दिला आहे. सोबत जळगाव शहर विधानसभा मतदानसाठी मतदान जनजागृतीची व मतदान करण्याची शपथ देण्यात आली.
मतदान करण्यासाठी समाजबांधवांनी घेतली शपथ
श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था यांच्या वतीने १४ ऑक्टोंबर सोमवार रोजी रात्री ८ वाजता जळगाव शहरातील मेहरूण, पिंप्राळा, दादावाडी, शिवाजी नगर, महाबळ, रामानंद नगर, शिव कॉलनी, आशाबाबा, कांचन नगर, जुने जळगाव खेडी या परिसरातील समाज बांधवांचा मेळावा शिंपी समाजाच्या मनोरमा बाई जगताप मंगल कार्यालय येथे महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांच्या प्रचारार्थ जळगाव शहर शिंपी समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या भव्य मेळाव्याला २ हजार समाज उपस्थित होते. याप्रसंगी प्रभाग समिती सदस्य व शिंपी समाज अ.भा माजी युवक अध्यक्ष मनोज भांडारकर यांनी २१ ऑक्टोंबर रोजी जळगाव शहर विधानसभा मतदानसाठी मतदान जनजागृतीची व मतदान करण्याची शपथ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प महिला मतदारांनी मोठ्या संख्याने मतदान करावे असे आवाहन यावेळी करून उपस्थित समाजबांधवाना शपथ दिली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी समाज उपाध्यक्ष विवेक जगताप, सचिव चंद्रकांत जगताप, सहसचिव दीपक जगताप, कोषाध्यक्ष संजय जगताप जिल्हा युवाध्यक्ष परेश जगताप, प्रशांत सोनवणे माजी समज अध्यक्ष मुकुंद मेटकर, मेळावा स्वागत अध्यक्ष शरद बिरारी, सुजित जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अनिल खैरनार, शाखा अध्यक्ष नाना कापडणे, मोहन चव्हाण, किशोर निकुम, सुधाकर शिंपी, निलेश कापुरे, मका सदस्य दिलीप भामरे, शिवदास शिंपी तसेच सुरेश सोनवणे, दिलीप सोनवणे, प्रदीप शिंपी, अरुण मेटकर, प्रशांत कापुरे, जगदीश जगताप, नथ्थू शिंपी, सोमनाथ बाविस्कर, बापू खैरनार, दत्तात्रय वारुळे, पद्माकर जगताप, किरण सोनवणे, गणेश सोनवणे, शरद गाडे, चेतन पवार , रमेश बोरसे, निलेश कापुरे, बापू सोनवणे, हेमंत शिंपी, प्रवीण चव्हाण, महिला मंडळ कुसुमताई बिरारी, विद्या सोनवणे, आशा जगताप, भाग्यश्री जगताप प्रज्ञा जगताप, माधुरी मेटकर, वैशाली भांडारकर यासह संख्येने समाज बांधव उपस्थित होते.