Home Cities भुसावळ उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मिळणार मोठे यश – अजय भोळे (व्हिडीओ)

उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मिळणार मोठे यश – अजय भोळे (व्हिडीओ)


ajay bhole 1

भुसावळ, प्रतिनिधी | जिल्ह्याचे आणि राज्याचे नेते ना. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मोठे यश मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना केवळ पाच-सहा जागा मिळू शकतील. असा विश्वास आज (दि.१६) येथे भाजपाचे प्रदेश ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस अजय एकनाथ भोळे यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना व्यक्त केला.

 

यावेळी जिल्ह्यात महायुतीच्या सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून येतील, तसेच भुसावळ येथील आ. सावकारे हे ही चांगल्या मतांनी निवडून येतील, असेही ते म्हणाले. नाथाभाऊंबाबतच्या निर्णयामुळे लेवा समाज नाराज झाला आहे का ? असे विचारले असता ते म्हणाले की, भाजपात जातीय विचार नाही, सत्ता मिळवणे हे पक्षाचे अंतिम उद्दिष्ट नसून सगळ्यांना सोबत घेवून चालणे हेच ध्येय आहे.

 

 


Protected Content

Play sound