जळगाव प्रतिनिधी । जळगावातून महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना मोठा लीड मिळणार असल्याचा आशवाद आज माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी व्यक्त केला. ते मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी शहरातून कुणाला मताधिक्य मिळणार यावर निकाल अवलंबून असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे महायुती आणि महाआघाडी या दोन्ही बाजूंकडून शहरावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाच हक्क बजावला. यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी शहरातून महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना चांगले मताधिक्य मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.
पहा : सुरेशदादा जैन नेमके काय बोलले ते !