जळगाव, प्रतिनिधी | महायुतीचे उमेदवार तथा जळगाव शहराचे आमदार. सुरेश भोळे यांचे प्रचार नारळ विजयादशमीच्या मुहूर्तावर वाढवून आज मंगळवार दि. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ५ वाजता श्रीराम मंदिर संस्थान (जुने जळगाव) येथे करण्यात आला.
आ. भोळे यांच्या प्रचारास सुरुवात करतांना जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. गिरीश महाजन, ना. गुरुमुख जगवाणी, जिल्हा परिषद अध्यक्षा ना. उज्वला पाटील, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आ. चंदूभाई पटेल, आ. स्मिता वाघ, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, महापौर सीमा भोळे आणि अनिल अडकमोल, नंदा बाविस्कर, लखन हटकर व सर्व महायुतीचे नगरसेवक, मंडळ अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, महिला पदाधिकारी, प्रभाग समिती सदस्य, शक्ती केंद्र प्रमुख, प्रमुख भाजपा-शिवसेना शिवसंग्राम रयत क्रांती महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आज प्रचार कोल्हेवाडा, वामनदादा खडके यांच्या घराजवळ, विठ्ठल मंदिर, भाग्यश्री टेंट, पांझरपोळ चौक, रथ चौक, सराफ बाजार, सुभाष चौक परिसरात करण्यात येत आहे. रॅली दरम्यान आ. सुरेश भोळे यांचे ठिकठिकाणी औक्षण करून विजय तिलक लावण्यात आले.