बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील सौर कृषीपंपधारक शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील विविध उपविभागांमध्ये विशेष तक्रार निवारण मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वीज ग्राहकांना अखंडित सेवा देण्याच्या उद्देशाने महावितरणकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. या मेळाव्यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, तक्रारी नोंदवून घेऊन त्या शक्य असल्यास जागीच सोडवण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रक्रियेत महावितरणच्या अभियंत्यांसोबतच सौर पंप बसविणाऱ्या एजन्सींचे प्रतिनिधीही प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याने तांत्रिक अडचणींचे निराकरण करणे अधिक सुलभ होणार आहे.
हे मेळावे संबंधित उपविभागीय कार्यालयांमध्ये सकाळी ११ वाजता सुरू होतील. यामध्ये १६ एप्रिल रोजी बुलढाणा व देऊळगाव राजा येथे, तर १७ एप्रिल रोजी चिखली, उदयनगर आणि संग्रामपूर येथे मेळावे पार पडतील. २० एप्रिल रोजी नांदुरा, खामगाव, धाड, खामगाव ग्रामीण आणि सिंदखेड राजा या भागात मेळावे होतील. त्यानंतर २१ एप्रिलला खामगाव शहर, शेगाव, लोणार व मेहकर आणि २२ एप्रिलला जळगाव जामोद, मोताळा व मलकापूर येथील शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी आपापल्या उपविभागीय कार्यालयात उपस्थित राहून आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन महावितरण प्रशासनाकडून करण्यात आले आ



