पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील गिरड रोडवर असलेले महावितरणचे मुख्य कार्यालय या ठिकाणी नुकतेच बदली झालेले शिरसाट यांच्या जागेवर नियुक्त झालेले प्रमोद हेलोडे यांनी पदभार स्वीकारून आपल्या कामाचा धडाका लावला आहे.
त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सर्वांना सूचना केल्या की, शहर व तालुक्यात जीर्ण असलेली तार त्वरित बदलावी तसेच वारंवार लाईट जाऊ नये याकरिता त्या – त्या परिसरातील वायरमन यांनी लक्ष द्यावे तसेच जुन्या झालेल्या डी.पी., त्यावरील जुने असलेले साहित्य बदलून त्वरित नवीन टाकावे तसेच ऑफिसला तक्रारी घेऊन आले असल्यास नागरिकांना योग्य सहकार्य करावे प्रमोद हेलोडे यांनी मोताळा येथे कनिष्ठ अभियंता म्हणून तसेच नांदुरा येथे उपविभागीय कार्यकारी अभियंता, खामगाव शहर उपविभागीय अतिरिक्त कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यानंतर त्यांची बदली पाचोरा येथे करण्यात आली आहे. त्यांची २४ वर्ष सेवा झाली असून पाचोरा शहर व तालुका म्हणून त्यांची अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांचा कामाचा दांडगा अनुभव असून त्यांनी कमी काळात शासनासाठी चांगले काम केले असून एम. एस. ई. बी. चे ते उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.
पाचोरा तालुका पत्रकार संघ व सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले, पत्रकार नंदकुमार शेलकर, फईम शेख, नंदलाल बोदडे, सेवानिवृत्त महावितरण अधिकारी हरीश आदिवाल, सेवानिवृत्त कर्मचारी, रुपेश चव्हाण, किशोर काशिनाथ पाटील, जितेंद्र माळी, रवींद्र माळी, पवन चौधरी, निलेश सुरवडकर, रामेश्वर राठोड, राहुल महाजन, संदीप मराठे, ज्ञानेश्वर राठोड, नामदेव नाईक यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहे.