जळगाव प्रतिनिधी । आम्ही सातत्याने गुणवत्तेवर आधारित ज्ञानदान अविरतपणे केले असल्यामुळे आज तीन दशकानंतरही महावीर क्लासेसचा नावलौकीक टिकून असल्याचे प्रतिपादन प्रा. नंदलाल गादिया यांनी केले. ते लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.
सध्या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून शाळा-कॉलेजांसोबत क्लासेसही गजबजले आहेत. जळगावात क्लासेससाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अलीकडच्या काळात तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विख्यात क्लासेसच्या शाखादेखील शहरात सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमिवर, गत तीन दशकांपासून क्लासेसमधील ख्यातप्राप्त नाव असणार्या महावीर क्लासेसचे संचालक प्रा. नंदलाल गादिया यांच्याशी लाईव्ह ट्रेंडस न्यूजने संवाद साधला. यात त्यांनी आपल्या आजवरच्या वाटचालीचा आराखडा प्रस्तुत केला.
प्रा. गादिया म्हणाले की, महावीर क्लासेसमध्ये पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांचे मार्गदर्शन उपलब्ध आहे. याशिवाय, सीईटी, नीट, जेईई आदी प्रवेश परिक्षांसाठीचे विविध कोर्सेस विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात आले आहेत. यासोबत एनटीएस आणि विविध फाऊंडेशन कोर्सेस, खास गणितासाठी असणार्या मॅथेक्स परिक्षेसाठीचे मार्गदर्शन येथे केले जाते. यासाठीचे अतिशय उच्च दर्जाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्याची माहिती गादिया सरांनी दिली. ते पुढे म्हणाले की, शहरात आता क्लासेसचे अनेक पर्याय असले तरी महावीमध्ये आम्ही गुणवत्ता, सातत्य आदींना प्राधान्य दिले आहे. अगदी रविवारीदेखील आमचा क्लास सुरू असतो. यामुळे वेळेचे अचूक नियोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबत येथे प्रत्येक विद्यार्थ्याकडे जातीने लक्ष दिले जाते. त्यांच्याकडून वेळोवेळी सराव करून घेतला जातो. यासाठी चाचण्या आम्ही नियमितपणे घेतो. त्या विद्यार्थ्यात सुधारणा होते की नाही ? याकडे लक्ष दिले जाते. यासाठी त्याच्या पालकाशी सातत्याने संपर्क ठेवून वेळोवेळी त्यांना त्यांच्या पाल्यांच्या प्रगतीची माहिती दिली जाते. याशिवाय, विद्यार्थ्यांना वरवर न शिकवता प्रत्येक विषयाचा सखोल अर्थ उलगडून शिकवला जातो. यातून विद्यार्थ्यांचा कनसेप्ट स्पष्ट होऊन त्याला त्या-त्या विषयात गती येते. यामुळे अनेक सामान्य दर्जाच्या विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परिक्षेत चांगले गुण मिळाल्याची अनेक उदाहरणे असल्याची माहिती प्रा. गादीया यांनी दिली.
प्रा. नंदलाल गादीया पुढे म्हणाले की, आम्ही विद्यार्थ्यांकडून दररोज सराव करवून घेतो. तसेच विद्यार्थ्यांना होमवर्कदेखील दिला जातो. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या मर्यादीत असते. याशिवाय, आम्ही सातत्याने नाविन्याचा ध्यास घेतला असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. महावीर क्लासेसमध्ये आम्ही सात-आठ वर्षांपासून आम्ही विद्यार्थ्यांची फिंगरप्रिंटच्या सहाय्याने हजेरी घेतो. नीट आणि जेईईसारख्या परिक्षा ऑनलाईन असल्याने आम्ही याच प्रकारात विद्यार्थ्यांचा सराव करून घेतो. याशिवाय, विद्यार्थ्याबाबतची माहिती एसएमएसच्या माहितीने पालकांना देण्यात आले. यामुळे गत तीन वर्षांमध्ये अनेक खाचखळगे आले. अनेकदा अभ्यासक्रम बदलले. तसेच या क्षेत्रात अनेक स्पर्धक आले. मात्र आम्ही सातत्य ठेवल्याने यशस्वी झाल्याचे ते म्हणाले. माऊथ-टू-माऊथ या प्रकारातील जाहिरातींच्या माध्यमातून आमच्याकडे विद्यार्थी येत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. काही क्लासेसचे चालक हे मार्केटींगच्या माध्यमातून पालकांना भ्रमित करण्याचा प्रकार करत असतात. तथापि, आम्ही आजवर असा कोणताही मार्ग अवलंबलेला नाही.
याप्रसंगी प्रा. नंदलाल गादीया यांनी पालकांना सल्लादेखील दिला. ते म्हणाले की, क्लास लावला म्हणजे सारे काही झाले असे नव्हे. यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासोबत अधून-मधून शाळा आणि क्लासेसमधील शिक्षकांशी संपर्क साधण्याचीही गरज आहे. यासोबत पाल्यांचे अति लाड करू नये. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्मार्टफोनच्या आहारी अनेक विद्यार्थी जातात. यामुळे यापासून आपल्या पाल्यांना दूर ठेवण्याचे आवाहन प्रा. नंदलाल गादीया यांनी केले.
संपर्क : महावीर क्लासेस, ख्वाजामियाजवळ जळगाव
दूरध्वनी : ०२५७-२२५४५४५
पहा : प्रा. नंदलाल गादीया यांच्याशी केलेल्या वार्तालापाचा व्हिडीओ.
महावीर क्लासेसचे गुगल मॅप्सवरील लोकेशन