भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील नाहाटा महाविद्यालयात मानस नीती व सामाजिक शास्त्र मंडळांतर्गत आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी अध्यक्षस्थानी म्हणुन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए.डी. गोस्वामी होते. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. के के अहिरे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानस नीती व सामाजिक शास्त्र मंडळाचे चेअरमन प्रा.साहेबराव राठोड यांनी प्रास्ताविक करताना मंडळाची भूमिका विशद करताना महापुरूष, महानायक, महामानव, यांच्या जयंत्या पुण्यतिथी आयोजन करून त्यांच्या विचारांना वैचारिकरीत्या उजाळा दिला जात असतो. त्यातून विद्यार्थ्यांची वैचारिक जडणघडण होत असते अशी भूमिका मांडली .
मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.के के अहिरे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आढावा घेताना स्त्री शिक्षणाचा उद्गाता म्हणून स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. एवढेच नव्हे तर बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. तसेच समाजातील अज्ञान पणा दारिद्र्य जातिभेद या सगळ्या गोष्टी पाहून महात्मा ज्योतिबा फुले यांनी ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली’ नीतीविना गती गेली. गतीविना वित्त गेले. वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले’ या ओळीप्रमाणे बहुजनांनीमधील अज्ञान दारिद्र्य जातिभेद संपवण्यासाठी त्यांनी शिक्षणावर भर दिला आणि सर्वसामान्यांना शिक्षणाचा महत्व पटवून दिले. लोकांनी सन्मानपूर्वक त्यांना ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी बहाल केली. तसेच जातीय प्रथा अस्पृश्यता भेदभाव निरक्षरता यांच्या निर्मूलनासाठी आयुष्यभर फुले दांपत्य कार्यरत राहिले.”
अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डॉ. ए.डी.गोस्वामी यांनी महापुरुषांच्या जीवन चारित्र्याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा वारसा जपावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विलास सोळुंके तर कार्यक्रमाचे आभार डॉ.डी एम टेकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ.एन.ई.भंगाळे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य डॉ.सचिन राजपूत प्रा.डॉ.दीपक शिरसाट प्रा.एस.टी.धूम, प्रा.भूपेंद्र बानाईत प्रा.डॉ.प्रफुल इंगोले, डॉ.राजेंद्र तायडे, डॉ.ललित तायडे, प्रा.पुरुषोत्तम महाजन, प्रा.दीनानाथ पाठक, प्रा.जितेंद्र आडोकार, प्रा.शितल सोनवणे, प्रा.उज्वला महाजन, प्रा.कविता पाडंव यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.