भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बांबरुड बुद्रुक येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात व सामाजिक बांधिलकीच्या भावनेत साजरी करण्यात आली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था भडगाव व भीम जयंती महोत्सव समिती बांबरुड बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामुळे गावात सामाजिक समतेचा व शिक्षणाचा संदेश पुन्हा एकदा दृढ झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय आबासाहेब सुनील पाटील सर उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून गोवर्धन महाजन, दत्तू महाजन, मच्छिंद्र पाटील, नानासाहेब देसले, ईश्वर भाऊ बाविस्कर, कृष्णा कोळी, भागवत पाटील, रवींद्र भिल्ल तसेच संस्थेचे अध्यक्ष खेडकर अण्णा विचारपीठावर विराजमान होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान संस्थेचे अध्यक्ष खेडकर अण्णा यांनी आपल्या मनोगतातून महात्मा फुले यांच्या कार्याची महत्ता अधोरेखित केली. त्यानंतर अध्यक्ष आबासाहेब सुनील पाटील यांनी आपल्या भाषणात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि समतेच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. त्यांनी सांगितले की, फुले यांचे महान कार्य अजरामर असून त्यांच्या विचारांना कोणीही पुसू शकत नाही. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.
या प्रसंगी सुभाष ईश्वर महाजन, आधार महाजन, सुभाष हिंमत महाजन, कैलास महाजन, विठ्ठल महाजन, दिलीप महाजन, श्रीकांत महाजन, राजू महाजन, प्रशांत महाजन, राजेश पाटील, अवधूत पाटील, दीपक कृष्णा कोळी, मनोज पाटील सर, संदीप कोळी, हरीश जोशी, सतलाल मराठे, अॅड. राकेश पाटील, दगडू ठाकरे, माणिक पिंगळे, पिरन शिवाजी पाटील, बाबूलाल तात्या, गणेश अहिरे, भरत भिल्ल, संदीप पाटील सर, सतीश पाटील, पोलिस पाटील, प्रकाश सूर्यवंशी, जयंती उत्सव अध्यक्ष विनोद खेडकर, भागवत दगडू पाटील, अरुण पाटील, डॉ. रवी पाटील, शरद पवार, सुभाष पाटील, साहेबराव जाधव, ग्रामसेवक आर. बी. पाटील, ग्रामसेवक आनंदा मराठे, किरण पितांबर पाटील, भाऊसाहेब साळुंखे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी अॅड. प्रदीप सूर्यवंशी, योगेश बाविस्कर, भूषण ब्राम्हणे, उमेश जाधव, नंदू सरदार, सुनील सोनवणे, सुरेश खेडकर, बादल अहिरे आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



