Home धर्म-समाज बोदवड येथे महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्साहात

बोदवड येथे महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती उत्साहात

0
69

बोदवड प्रतिनिधी । येथील आदिवासी संघर्ष समिती उपजिल्हा कार्यालयात आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त उत्साहात साजरी करण्यात आली.

पंचायत समितीचे सभापती किशोर गायकवाड यांनी फोटोचे पूजन केले. या ठिकाणी सेवानिवृत्त मुख्यध्यापक बि. डी. इंगळे यांनी महर्षी वाल्मिकी बाबत आपले मनोगत व्यक्त केले. पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष रमेश इंगळे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुपडा निकम, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष विनोद कोळी, जिल्हा सरचिटणीस पोलीस पाटील संघटना गोपाल पाटील तसेच आदिवासी संघर्ष समिती तालुकाध्यक्ष जगदीश कोळी, आदिवासी संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कोळी, अनंता वाघ, अध्यक्ष अनिल देवकर, जिल्हाध्यक्ष हिंदू एकता अध्यक्ष सचिन उगले, दिव्यांग तालुकाध्यक्ष भगवान कोळी, गणेशगिरी गोसावी वेब मिडीया तालुकाध्यक्ष जाफर  मन्यार तसेच गजानन बेलदार पत्रकार महासेन सुरडकर यांच्यासह आदी उपस्थितीत होते.

 


Protected Content

Play sound