ब्रिटनच्या निवडणूकीत महाराष्ट्रीयन सुशील रापटवारांना कंझरव्हेटिव्ह पार्टीकडून उमेदवारी

लंडन-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जगभर उत्सुकता असलेल्या ब्रिटनच्या सार्वजनिक निवडणूकांसाठी उद्या ४ जुलै रोजी मतदान होणार आहे. ब्रिटनमधला सत्ताधारी कंझरव्हेटिव्ह पार्टी आणि लेबर पार्टी या दोन प्रमुख पक्षांत चुरशीची लढत आहे. यंदाच्या निवडणुकीत कंझरव्हेटिव्ह पार्टीकडून लंडन इथे अनेक वर्षे स्थायिक असलेले सुशील रापटवार आहे.

त्यांना ब्रेन्ट वेस्ट या मतदार संघातून उमेदवारी दिली गेली आहे. सुशील रापटवार हे मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. ते व्यवसायाने इंस्ट्रुमेनटेशन इंजिनिअर आहेत. ते सध्या एका बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. ते बॅडमिंटनचे उत्तम खेळाडू असून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बॅडमिंटन स्पर्धांसाठी पंच म्हणूनही काम केले आहे. ते लंडनमध्ये दर मंगळवारी एक रेडीओ स्टेशन चालवतात.

Protected Content