महाराष्ट्र कुणापुढेही झुकणार नाही, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव असेल तरच बोला : संजय राऊत

sanjay raut

 

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र कुणापुढेही झुकणार नाही, अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव असेल तरच बोला असे संजय राऊत यांनी भाजपला ठामपणे सांगितले आहे. तत्पूर्वी संभाजी भिडे मध्यस्थी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. मात्र उद्धव यांनी ही भेट नाकारली. यावर भाजप-शिवसेना चर्चेत मध्यस्थींची गरज नसल्याचे आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले.

 

भाजप-शिवसेनेमध्ये तिसऱ्या कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम असून मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव घेऊन येणार असाल तर बोला,’ अशा शब्दांत शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भूमिका मांडली. त्यामुळे आता सत्तास्थापनेचा चेंडू भाजपच्या कोर्टात असून भाजप काय निर्णय घेते हे पाहावे लागणार आहे. महाराष्ट्रात कर्नाटकप्रमाणे घोडेबाजार होईल का? असं जर माध्यमांना वाटत असेल तर महाराष्ट्रात पारदर्शकता शिल्लक नाही असेच म्हणावे लागेल असेही राऊत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र कधीही कोणाही समोर झुकणार नाही. शरद पवार जसे कोणाही समोर झुकले नाहीत तसेच उद्धव ठाकरेही कोणाही समोर झुकणार नाहीत असेही संजय राऊत म्हटले आहेत.

Protected Content