महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने जपला जातीय सलोखा, श्रावण सोमवारनिमित्त फराळ वाटप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  राज्यात नेहमी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे जळगावात पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त जातीय सलोखा जपण्यात आला. अधिक मासातील पहिल्या सोमवारी ५१ किलो साबुदाणा खिचडी आणि केळीचे वाटप करण्यात आले.

 

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या जळगाव भास्कर मार्केट येथील कार्यालयात सोमवारी सकाळी ११ वाजता फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक अमित काळे, उद्योजक रोहन पाटील, संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख कुणाल मोरे, जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे, अकील शेख, जितू सोनार, दीपक वारुळे, आश्विन सारस्वत, दिलीप साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत फराळ वाटप करण्यात आला.

 

उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष असून आज ५१ किलो साबुदाणा खिचडी आणि ५१ डझन केळीचे वाटप करण्यात आले. पुढील सोमवारी २५१ बेल रोपांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा संपर्क प्रमुख कुणाल मोरे यांनी दिली आहे. आज उपक्रमाला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अवघ्या काही मिनिटात सर्व फराळचे वाटप करण्यात आले.

Protected Content