चिंचोली गावातील प्रकरणाबाबत गावकऱ्यांसह महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील चिंचाली गावात सार्वजनिक बांधकाम विभागच्या वतीने कोणतीही पुर्वकल्पना न देता दोन नाभिक समाजाचे सलून दुकाने जेसीबीद्वारे जमीन दोस्त करून सामान विहिरीत फकून दिले. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून समाज बांधवांना न्याय देण्यात यावा या मागणीचे निवेदन शुक्रवारी २१ जुलै रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील चिंचोली गावात ४२ अतिक्रमण धारकांनी ग्रामपंचायतीच्या सर्वजनिक जागेवर अतिक्रमाण केले होते. याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी सर्व अतिक्रमणधारकांना तीन वर्षांपुर्वी नोटीस बजावली होती. तरी कुणीही अतिक्रमण काढले नाही. आता अचानक पावसाळ्याच्या दिवसांत कोणतीही नोटीस किंवा तोंडी सुचना न देता जेसीबीच्या माध्यमातून गावातील अतिक्रम काढण्यासाठी दिलीप चंडावार आणि जैस्वाल हे आले. ४२ अतिक्रमणधारकांपैकी फक्त दोन नाभिक समाजाचे दोन सलून दुकाने जेसीबीद्वारे जमिनदोस्त करण्यात आले. व सर्व सामान नजीकच्या विहिरीत टाकून दिल्याचा प्रकार घडला आहे. नाभिक समाज हे गरीब असल्याने त्यांची उपजिवीका त्यावरच अवलंबून होती. याबाबत जाब विचारला असता अधिकाऱ्यांनी तुम्हाला जे कारायचे आहे ते तुम्ही करा अशी एकतर्फी वागणूक दिली. त्यामुळे नाभीक समाज बांधवांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल वाघ यांनी दिले आहे.

याप्रसंगी जळगाव जिल्हा अध्यक्ष कांतीलाल वाघ, जिल्हा उपाध्यक्ष नाना वाघ, जिल्हा उपाध्यक्ष संजय अहिरे, जिल्हा सचिव जगन वखरे, शहराध्यक्ष रमेश शिंदे, शहर उपाध्यक्ष मनोज बिढे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content