रावेरमध्ये महाराष्ट्र-मध्यप्रदेश बॉर्डर मीटिंग: निवडणूक काळात चोख बंदोबस्ताचे नियोजन

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या बॉर्डर मीटिंग संपन्न झाली. या बैठकीत दोन्ही राज्यांच्या सीमेवर चेक पोस्ट, गुन्हेगारांची हालचाल, अवैध दारू, तसेच निवडणूक काळात सीमेवर चोख बंदोबस्त ठेवण्याच्या विषयावर चर्चा झाली.

रावेर शहरातील पंचायत समितीच्या हॉलमध्ये ही महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील गुन्हेगारी बाबत चर्चा झाली. निवडणूक काळात अवैध दारू तसेच रोख स्वरूपात पैसे नेणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीला प्रांताधिकारी बबन काकडे, बुरहानपुर प्रांताधिकारी पल्लवी पूरानिक, विभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंग, बुरहानपुर उपविभागीय पोलिस अधिकारी गौरव पाटील, रावेर तहसीलदार बंडू कापसे, बुरहानपुर तहसीलदार रामलाल पगारे, पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर, टीआय अमिल सिंह जादौग, वनक्षेत्रपाल अजय बावणे, वनक्षेत्रपाल बुरहानपुर अजय सागर, बिडिओ के पी वानखेडे, वनक्षेत्रपाल पियूष चौधरी, टीआय कैलास चव्हाण, एएसआय हेलापडावा संतोष चौधरी यांच्यासह मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे अधिकारी उपस्थित होते.

Protected Content