मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांच्या पाठोपाठ बाबा सिद्धीकी यांनी काँग्रेसच्या पदाचा राजीनामा देत असल्याचे ट्विट केले आहे. ते राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते अजित पवार गटात जाणार, अशी चर्चा होती. माझा काँग्रेसमधील आतापर्यंतचा प्रवास चांगला राहिला. या आठवणी कायम स्मरणात राहतील, अशी प्रतिक्रिया बाबा सिद्दीकी यांनी दिली. मिलिंद देवरा यांच्यानंतर काँग्रेसचा मुंबईतील आणखी एक नेता बाहेर पडला आहे.