जळगाव प्रतिनिधी । उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ राज्यव्यापी संपाची हाक दिलेली आहे. या अनुषंगाने आज सोमवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास टॉवर चौक परिसरातील दुकानदारांना महाविकास आघाडीने दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी शहरातील व्यापारी व दुकानदारांकडून बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
सविस्तर असे की, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेत शेतकऱ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यू झाला होता. याच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यव्यापी बंद पुकारला होता. त्या अनुषंगाने आज सोमवार ११ ऑक्टोबर रोजी १० वाजता जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते रस्त्यावर उतरून बंद ठेवण्याचे आवाहन शहरातील व्यापारी व दुकानदारांना आवाहन केले. यावेळी शहरातील टॉवर चौक, फुले मार्केट, दाणाबाजार, गांधी मार्केट, गोलाणी मार्केट, न्यू बी.जे. मार्केट, बोहरा गल्ली परिसर, चित्रा चौक परिसरात महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट दुकानदारांना सांगून दुकाने बंद ठेवावे असे सांगण्यात येत होते.
याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना महानगराध्यक्ष श्याम तायडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्या पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष , अशोक लाडवंजारी यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती.