मनपा स्थायी सभापतीपदी ॲड.सुचिता हाडा यांची बिनविरोध निवड

hada1

जळगाव प्रतिनिधी । मनपा स्थायी समिती सभापतीपदी ॲड. सुचिता हाडा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत पार पडली.

स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपतर्फे चार जणांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. यात भगत बालानी, दिलीप पोकळे, राजेंद्र घुगे पाटील यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे ॲड. सुचिता हाडा यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. तसेच महिला बालकल्याण समिती सभापतीपदी शोभा बारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Protected Content