Home Cities चाळीसगाव ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या तालुकाध्यक्षपदी महाले, पटेल कार्याध्यक्ष

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या तालुकाध्यक्षपदी महाले, पटेल कार्याध्यक्ष


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या चाळीसगाव तालुकाध्यक्षपदी कल्पेश महाले तर तालुका कार्याध्यक्षपदी मुराद पटेल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

व्हाईस ऑफ मीडिया चे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश उजैनवाल, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डिगंबर महाले, जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके, यांच्या उपस्थितीत चाळीसगाव तालुकाध्यक्ष पदी कल्पेश विजय महाले, यांची नियुक्ती करण्यात आली. आर.डी.चौधरी, एम बी पाटील, जिजाबराव वाघ, आनंद शिंपी, सूर्यकांत कदम यांचे मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष वाल्मीक गरुड, कार्याध्यक्ष मुराद पटेल, सचिव कलीम सैय्यद, सदस्य पदी रामलाल चौधरी, मंगेश शर्मा, योगेश मोरे, विजय गायकवाड, आरिफ खाटीक तारकेश्वर परदेशी, रणधीर जाधव, आकाश धुमाळ, शरीफ मिर्झा, अफरोज खान यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी चाळीसगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बंधुभगिनींना ‘व्हाईस ऑफ मिडिया’चे सदस्य होऊन संघटना मार्फत होणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.


Protected Content

Play sound