

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर व परिसरातील नागरिकांसाठी एक अत्याधुनिक व बहुवैद्यकीय सेवा केंद्र म्हणून “महादेव हॉस्पिटल”ने रुग्णसेवेच्या क्षेत्रात आपली भक्कम उपस्थिती नोंदवली आहे. अनुभवी डॉक्टरांची टीम, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, आणि परवडणाऱ्या दरातील सेवा यामुळे हे रुग्णालय शहरातील आरोग्य सेवेसाठी एक नवे आरोग्यधाम ठरत आहे.
महादेव हॉस्पिटलची स्थापना व्यवस्थापन गुरू डॉ. प्रशांत वारके आणि सुप्रसिद्ध डी.एम. कार्डियोलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. या रुग्णालयामध्ये २४ तास आपत्कालीन सेवा, सुसज्ज आयसीयू, नवजात शिशूंसाठी एनआयसीयू, उच्च तंत्रज्ञानयुक्त ऑपरेशन थिएटर, रेडिओलॉजी विभाग (सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स-रे), तसेच अचूक निदानासाठी अद्ययावत प्रयोगशाळा अशा सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या रुग्णालयात हृदयविकारतज्ज्ञ, मेंदू व मणक्याचे विकारतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, मूत्र व किडनी विकारतज्ज्ञ, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ अशा विविध क्षेत्रातील नामवंत आणि अनुभवी तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कुशल नर्सिंग स्टाफ आणि प्रशिक्षित पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची फळी रुग्णांच्या सेवेस तत्पर आहे.
वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आणि बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या नव्या आजारांवर तात्काळ व दर्जेदार उपचार देण्यासाठी शहरात अशा आधुनिक रुग्णालयाची नितांत गरज होती. महादेव हॉस्पिटलच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होत असून, रुग्णांना आता मोठ्या शहरात जाऊन उपचार घ्यावा लागणार नाही. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सेवा मिळाव्यात, हा रुग्णालय प्रशासनाचा प्रमुख उद्देश आहे.
महादेव हॉस्पिटलने केवळ वैद्यकीय सेवा नव्हे तर विश्वास, देखभाल आणि जबाबदारीचा आदर्श उभा केला आहे. शहरातील नागरिकांसाठी हे रुग्णालय केवळ उपचार केंद्र न राहता, आरोग्यदायी जीवनाकडे नेणारा विश्वासाचा दुवा बनत आहे.



