रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील चिनावल येथील प्रगतिशील शेतकरी तसेच महाराष्ट्र राज्य महाबनाना संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव गणपत महाजन यांचे आज दिनांक ४ एप्रिल रोजी निधन झाले.
ज्ञानदेव महाजन हे सहकार क्षेत्रात कार्यरत होते चिनावल येथील सहकारी संस्थांमध्ये त्याचा हिरारीने सहभाग असायचा. केळी प्रदेशात सर्व प्रथम पाठवण्यात त्याच महत्त्वाचा वाटा होता. त्याचे पश्चात पत्नी ,१ मुलगा ,सून नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते तुषार ज्ञानदेव महाजन यांचे वडील होते
जळगाव जिल्ह्यातील केळीला महाबनाना या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लौकीक मिळवून दिला. केळीचे गाढे अभ्यासक असणारे महाजन यांच्या निधनाने एक सच्चा प्रगतीशील शेतकरी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना परिसरातून व्यक्त होत असून त्यांना समाजाच्या सर्व स्तरांमधून आदरांजी अर्पण करण्यात येत आहे.