पाचोरा प्रतिनिधी । शिवसेनेच्या वतीने कोविड -१९ प्रतिबंधात्मक महालसीकरण महामेळावाने पुन्हा एकदा शहरात एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. ६ हजार ५१९ नागरिकांना पहिल्या आणि दुसऱ्या लसीकरणाचा लाभ देऊन लसीकरणाच्या राष्ट्रीय कार्यात योगदान दिले आहे.
८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या ब्रीदवाक्याप्रमाणे पाचोरा शिवसेनेच्या वतीने विविध समाजपोयोगी उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सहा भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होत्र. गेल्या काही दिवसांपासून शहरातील लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. त्यातच शहरातील विविध टोकाला राहणाऱ्या वयस्क व्यक्तींना लस घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत होते. व तासंतास थांबावे लागत होते. याची दखल घेत आमदार किशोर पाटील यांनी प्रशासनाला सूचना करत शहरातील विविध भागात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज शहरातील जनता वसाहत, नागसेन नगर वाल्मिकी नगर आदी भागासाठी धमोदय बौद्ध विहारात, देशमुखवाडी व परिसरातील नागरिकांसाठी अहिरसुवर्णकार मंगल कार्यालयात तसेच उपनगराध्यक्ष पती गंगाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रंगार गल्ली भागातील जनतेसाठी मोर भुवन मध्ये, तसेच कोंडावाडा गल्ली, बाहेरपुरा, त्रंबक नगर या ठिकाणी लसीकरण शिबीर संपन्न झाले. या सर्व ठिकाणी शिस्तबद्धरित्या नागरिकांना कोविड – १९ लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. त्यामुळे नागरिकांच्या चेहर्यावर समाधान पाहावयास मिळत होते. दरम्यान शहरातील या विविध लसीकरण केंद्रांवर जाऊन आमदार किशोर पाटील, मुकुंद बिलदीकर, नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी लसीकरण ठिकाणी भेटी देत नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत केले. तर पप्पू राजपूत यांनी शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर भेटी देत प्रशासन व शिवसैनिकांमध्ये समन्वय साधला. शिवसेनेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होतांना दिसत असून आ. किशोर पाटील यांच्या प्रती आभाराचे भाव उमटतांना दिसत आहेत. महालसीकरण शिबिराच्या यशस्वीतेसाठी माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक सतीश चेडे, गंगाराम पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, सुमीत किशोर पाटील, बंडू चौधरी, प्रवीण ब्राह्मणे, संदीप राजे पाटील, सुमीत सावंत, महेश पाटील, सौरभ चेडे, नगरसेवक दादाभाऊ चौधरी, राजू पाटील, छोटू चौधरी, गणेश पाटील, प्रमोद सोनार आदींनी परिश्रम घेतले.