जामनेर (प्रतिनिधी) भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती सेना महायुतीच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई निखिल खडसे यांच्या प्रचारार्थ जामनेर येथे भव्य रॅली पार पडली. याप्रसंगी नगराध्यक्षा साधनाताई गिरीष महाजन, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद पाडळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आज सकाळी शहरातून रक्षाताई खडसेंच्या प्रचारार्थ जामनेरात भव्य रॅली काढण्यात आली. शहरातील सर्व प्रमुख मार्गांवरून ही रॅली निघाली. यावेळी नागरिकांनी रक्षाताई खडसे यांचे उस्फुर्त स्वागत केले. ठीकठीक ठिकाणी रक्षाताई खडसे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या जात होत्या. यावेळी अॅड. शिवाजी नाना सोनार, विस्तारक नवलभाऊ पाटील, पंस सभापती निताताई पाटील, उपनगराध्यक्ष अनिस शेख, नगरसेवक जितेंद्र पाटील, महेंद्र बाविस्कर, बाबुराव हिवराळे, छगन झाल्टे पालिका गटनेते डॉक्टर प्रशांत धोंडे, शितल सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य राजेश पाटील, विलास बापू पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर, पंचायत समिती सदस्य रमण चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुकाराम निकम, गोपाळ नाईक, लिनाताई पाटील, ज्योतीताई पाटील, कल्पनाताई पाटील, मंगलाताई माळी, प्रवीण नरवाळे, नाझीम पार्टी, शरद पाटील, आनंद वेटोळे, श्रीराम महाजन, दीपक तायडे, दत्तू सोनवणे, उल्हास पाटील, रवींद्र झालटे, पंचायत समिती सदस्या सुनंदाताई पाटील, शहराध्यक्ष अतिष झालटे, हारुण चौधरी, फारुख मण्यार, शिवसेनेचे सुधाकर सराफ व महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.