Home Cities यावल यावल तालुक्यात प्रसिद्ध जादुगर विश्वजीत यांचा मॅजीक शो

यावल तालुक्यात प्रसिद्ध जादुगर विश्वजीत यांचा मॅजीक शो


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डोणगाव-किनगाव रोडवरील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल येथे उद्या रविवार दि.२ फेब्रुवारी रोजी आनंद मेळावा व जादुगर विश्वजीत यांच्या मॅजीक शोचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रसिध्द असलेल्या मेनुचे खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल विद्याथी या आनंद मेळाव्यात लावणार आहेत. या आनंद मेळाव्यासाठी स्वतंत्र समीती तयार करण्यात आली असुन समीतीने तयार केलेल्या नियमावलीनुसारच खाद्यपदार्थ विक्री करता येणार आहेत व खाद्य पदार्थ खरेदीसाठी कुपन घेणे आवश्यक असणार आहे.

इ.४ थी ते इ.९ वी पर्यंतच्याच विद्यार्थ्याना या आनंद मेळाव्यात स्टॉल लावण्याची परवाणगी देण्यात आली आहे अगदी शिस्तबद्ध पध्दतीने होणाऱ्या या आनंद मेळाव्याला सालाबादाप्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.दुपारी 3 ते ५:30 पर्यंत व सायंकाळी ७:30 ते ८:30 पर्यंत हे स्टाल सुरु राहणार आहेत तर सायंकाळी ६ ते ७: 30 वाजेदरम्यान जादुगर विश्वजीत यांच्या मॅजीक शो चे आयोजन करण्यात आले आहे.

 


Protected Content

Play sound