मध्यप्रदेशात देशातील पहिल्या ‘टाइम बँके’चा अनोखा प्रयोग

sharing puzzle

भोपाळ, वृत्तसंस्था | मध्य प्रदेशात देशातली पहिली ‘टाइम बँक’ सुरू होणार आहे. ही बँक रुढार्थाने आपल्या पैशांच्या देवाण-घेवाणीच्या बँकेसारखी बँक नव्हे. येथे देवाणघेवाण होणार ती वेळेची, किंबहुना सत्कारणी लावलेल्या वेळेची. या टाइम बँकेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतीही स्वेच्छिक सेवा द्या आणि त्या बदल्यात तुमच्या खात्यात तितकेच तास जमा केले जातील, ज्यांचा उपयोग तुम्ही अशाच कुठल्या अन्य प्रकारच्या सेवेसाठीही करू शकाल.

 

राज्य सरकारच्या अध्यात्म विभागाने शुक्रवारी हा आदेश जारी केला. अपर मुख्य सचिव मनोज श्रीवास्तव यांनी सांगितले की या संबंधी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या योजनेचा उद्देश लोकांमध्ये एकमेकांबद्दल सेवाभाव वाढवणे हा आहे. कोणी एखाद्या गरजवंताची जितकी मदत करेल, तितके तास त्याच्या खात्यात जमा होतील. जेव्हा त्याला कधी मदतीची गरज असेल, तेव्हा याच जमा तासांच्या मदतीने त्याला ‘टाइम बँक नेटवर्क’मधून अन्य कुणाची मदत मिळेल. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या ज्येष्ठ नागरिकाची काळजी घेत आहात किंवा गरीब मुलांना शिकवत आहात तर त्याबदल्यात तुमच्या खात्यात काही तास जमा होतील.

Protected Content