फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील मधुकर साखर कारखाना कर्मचार्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. कारखाना शासनाच्या माध्यमातून सुरू झाला पाहिजे,अशी यावेळी अपेक्षा या बैठकीत कामगरांकडून व्यक्त करण्यात आली.
मधुकर सहकारी साखर कारखाना सुरू झाला पाहिजे अशी सर्वच स्तरातून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या अनुषंगाने आज शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कारखाना परिसरातील हनुमान मंदिर याठिकाणी कारखान्याचे पटावरील व जे कामावर येण्यासाठी इच्छुक आहे अशा कामागारांची कारखान्याच्या कामगार संघटना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.
कामगारांची थकीत देणी मिळावी यासाठी कारखाना लिलाव प्रक्रियेवर शासनाने स्थगिती दिली आहे.आणि कामगारांची थकीत देणी मिळावी या मागणीवर कामगार ठाम आहे.म्हणून कामगारांची थकीत देणी मिळावी व कारखाना सुरू करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे.ही अपेक्षा घेवून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष किरण चौधरी, सचिव सुनील कोलते,उपाध्यक्ष हरी इंगळे यांच्यासह बहुसंख्य कामगार उपस्थित होते.
दरम्यान, कारखाना कामगारांची सर्वच थकीत देणी मिळावी या मागणीवर कामगार व कामगार संघटना ठाम आहे.सहा वर्षांपासून कामगारांना पगार नाही.त्यामुळे उपाससमारीची वेळ आल्याने हलाखीची परिस्थितीचा सामना करत आहे. त्यासाठी कामगारांची थकीत देणी मिळण्यासह कारखाना सुरू करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे.असे कामगार संघटना अध्यक्ष किरण चौधरी व सचिव सुनील कोलते यांनी सांगितले.