चाळीसगाव (प्रतिनिधी) जळगाव मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांचा तालुक्यातील बदरखे येथे आज (दि.१०) धनगर समाज उन्नती मंडळ तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोहळा समितीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी खा. पाटील यांनी आपण मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी समाजकन्या पीएसआय मिनाक्षी कंखरे व आदर्श शिक्षक विशाल परदेशी यांचा खासदारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. उज्वलाताई पाटील, पाचोऱ्याचे आमदार किशोर आप्पा पाटील, जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, पाचोरा पंचायत समितीचे सभापती बन्सीलाल पाटील, जिल्हा धनगर समाज अध्यक्ष रामेश्वर परदेशी, रा.स.प.चे जिल्हा अध्यक्ष गणेश जाणे, नमो ग्रुपचे राज्य अध्यक्ष प्रमोद परदेशी, पहूरचे सरपंच रामेश्र्वर पाटील, नमो महाराष्ट्र शाखेचे सदस्य, समस्त बदरखे, आखतवाडे व मोहळाई ग्रामस्थ उपस्थित होते.