एम.एम. महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिनानिमित्त १०० सेकंद स्तब्ध उभे राहून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी मनोगतामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या लोकोपयोगी कामांचे, योजनांचे, दीनदुबळ्यांसाठी केलेल्या कार्याचे वर्णन केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षण ते शिक्षण आणि दीनदुबळ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या कार्याचेही वर्णन त्यांनी केले.

याप्रसंगी उपप्राचार्य प्रो. डॉ. जे. व्ही. पाटील, डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. एस. आर. ठाकरे, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, प्रा. के. एस. इंगळे, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अधिकराव पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. इंदिरा लोखंडे, प्रा. प्राजक्ता शितोळे,  प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. नितीन पाटील, प्रा. सुनील पाटील, प्रा. जितेंद्र पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. माणिक पाटील तर आभार प्रदर्शन प्रा. वाय. बी. पुरी यांनी केले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!